महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोदींच्या भाषणातून 'विकास' गायब; मुद्द्यापेक्षा व्यक्तींवर टीका - पृथ्वीराज चव्हाण - amit saha

राफेलचा घोटाळा हा अतिशय निर्ढावलेल्या पद्धतीने केलेला गंभीर असा गुन्हा आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली. चौकीदार हा शब्द ज्या ज्यावेळी ऐकतो त्या त्यावेळी मला राफेल आठवतो. चौकीदार चोर आहे हेच समोर येते, अशी मिश्किल टिप्पणी चव्हाण यांनी केली.

पृथ्वीराज चव्हाण यांची मोदीवर टीका

By

Published : Apr 2, 2019, 11:03 AM IST

पुणे - पंतप्रधान मुद्दयावर बोलत नाही, विकास हा शब्दच त्यांच्या भाषणातून गायब झाला आहे, प्रोटोकॉल गुंडाळून ते मुद्द्यापेक्षा व्यक्तीवर टीका करण्यावर त्यांचा भर आहे. पंतप्रधान मोदींनी देशासमोर काय प्रश्न आहेत पुढची काय उद्दिष्ट आहेत यावर बोलावे अशी अपेक्षा आहे मात्र, ते व्यक्तिगत पातळीवर टीका करतात. असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर हल्लाबोल केला. ते सोमवारी पुण्यात पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण यांची मोदीवर टीका


वर्धा इथल्या सभेत ही मोदी व्यक्तिगत पातळीवर उतरल्याचे दिसते. राहुल गांधी, प्रियांका गांधीवर वैयक्तीक टीका करत आहेत. पंतप्रधान मोदी शरद पवार आणि त्यांच्या कुटूंबियावर टीका करत आहेत. आज मुख्यमंत्र्यांकडून आणि त्यांच्या बॉस म्हणजे अमित शहा दडपशाहीचा कार्यक्रम सुरू आहे. राफेलचा घोटाळा हा अतिशय निर्ढावलेल्या पद्धतीने केलेला गंभीर असा गुन्हा आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली. चौकीदार हा शब्द ज्या ज्यावेळी ऐकतो त्या त्यावेळी मला राफेल आठवतो. चौकीदार चोर आहे हेच समोर येते, अशी मिश्किल टिप्पणी चव्हाण यांनी केली. मोदी या माणसाला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहे, मात्र काही वंचित आघाडी सारखे पक्ष मॅनेज झाले आहेत, असे सांगत रत्नागिरीमध्ये काँग्रेसने दिलेल्या सनातन समर्थक उमेदवाराबद्दल आम्ही पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. त्याबाबत योग्य तो निर्णय वरिष्ठ घेतील असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details