पुणे - दाभोळकर हत्या प्रकरणात उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांवर ओढलेले ताशेरे ही अत्यंत गंभीर बाब आहे. दाभोळकर हत्या प्रकरणासह ४ हत्या झालेल्या आहेत. या चारही प्रकरणात केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने गलथानपणाची भूमिका घेतली आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
दाभोलकर हत्या प्रकरण; केंद्र व राज्य सरकारवर पृथ्वीराज चव्हाणांची टीका - fadnvis
एका विशिष्ट वर्गाला मदत करायची त्यांची भूमिका आहे. उच्च न्यायालयाने देखील तेच म्हटले आहे, त्यामुळे जनतेला काय चालले आहे ते कळाले असून, याबाबत त्यांना वेगळे सांगायची गरज नाही.
पृथ्वीराज चव्हाण यांची सरकारवर टीका
एका विशिष्ट वर्गाला मदत करायची त्यांची भूमिका आहे. उच्च न्यायालयाने देखील तेच म्हटले आहे, त्यामुळे जनतेला काय चालले आहे ते कळाले असून, याबाबत त्यांना वेगळे सांगायची गरज नाही. आता तर उच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून माझी फारशी काही अपेक्षा नाही. हे काही वेगळे वागतील, असे वाटत नाही, त्यांची भूमिका ही ठरलेली आहे, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.