पुणे- येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये काही कैद्यांनी कारागृह अधिकारी आणि एका कैद्याला मारहाण केल्याच्या 2 घटना समोर आल्या आहेत. या आधीही या कारागृहात मारहाणीच्या अनेक घटना घडल्या आहेत.
येरवडा कारागृहात मारहाणीचे सत्र सुरूच; 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये कारागृह अधिकारी, कैदी जखमी - कैदी
कारागृहामध्ये नुकतेच तुषार हंबीर या कायद्याला तीन कैद्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर कारागृह अधिकारी पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना 14 कैद्यांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, कारागृहामध्ये नुकतेच तुषार हंबीर या कायद्याला तीन कैद्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर कारागृह अधिकारी पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना 14 कैद्यांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
त्याप्रमाणेच बुधवारी सकाळी 5 ते 6 कैद्यांनी मिळून एका कैद्याला बेदम मारहाण केली. यावेळी त्याच्या डोक्याला दगड लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे त्याला वैद्यकीय उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये संशयितांविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिसांनी संशयितांकडे तपास सुरू केला आहे.