पुणे - प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे भाषण सुरू होते. त्यावेळी पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मधेच घोषणाबाजी करत मंत्री खोतांना जाब विचारला. या घोषणाबाजीने कार्यशाळेत चांगलाच गोंधळ उडाला होता.
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कार्यक्रमात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
पुणे येथे प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यस्तरीय कार्यशाळेत कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत बोलत होते. यावेळी पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मधेच उठून त्यांना जाब विचारणे सुरु केले आणि 'पिक विमा फसवी आहे, खोटी आहे' अशी घोषणाबाजीही केली.
पुणे येथे प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यस्तरीय कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी राज्यमंत्री बोलत असतानाच पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मधेच उठून जाब विचारणे सुरू केले आणि 'पिक विमा फसवी आहे, खोटी आहे' अशी घोषणाबाजीही केली.
घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये पूजा झोळे पुणे, अजिंक्य नागटिळक पंढरपूर, सौरभ वळवडे सांगली, सूरज पंडित परभणी या चौघांचा समावेश होता. तर कार्यशाळेत गाोंधळ माजल्याने पोलिसांनी कार्यशाळेत दाखल होऊन घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर काढले.