महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्यांनी' स्वीकारले शेकडो मोरांंचे पालकत्व! - मोरांचे अस्तित्व

सध्या उन्हाळा सुरू असल्याने मोर चारा-पाण्याच्या शोधात लोकवस्त्यांकडे वळत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे नागरिकही यो मोरांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे चारा-पाण्याच्या कमतरतेमुळे मोरांचे आस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Peacock
मोर

By

Published : Apr 5, 2020, 12:41 PM IST

पुणे -कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेला लॉकडाऊन आणि कडाक्याच्या उन्हाचा फटका पक्षांना बसत आहे. अनेक पक्षांना अन्न पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पुणे परिसरातील मोरांच्या अन्नपाण्याची व्यवस्था खरपुडी येथील राजेंद्र गाडे यांनी केली.

मोरांसह इतर पक्षांची अन्न-पाण्यासाठी फरपट

सध्या उन्हाळा सुरू असल्याने मोर चारा-पाण्याच्या शोधात लोकवस्त्यांकडे वळत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे नागरिकही यो मोरांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे चारा-पाण्याच्या कमतरतेमुळे मोरांचे आस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरपुडी येथील खंडोबा देवस्थानचे पुजारी राजेंद्र गाडे यांनी या मोरांचे पालकत्व स्वीकारले आहे. त्यांनी परिसरातील मोरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details