पुणे Droupadi Murmu Met Pratibha Patil : देशाच्या दोन महिला आजी-माजी राष्ट्रपती यांची पुण्यात अनोखी भेट झाली. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (Pratibha Patil) यांच्या निवासस्थानी जाऊन द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी भेट घेतली आहे. याप्रसंगी अँड. प्रताप परदेशी आणि डॉ. अविनाश भोंडवे यांनी लिहिलेल्या 'बाल रक्षण कायद्याचं (Pocso) अंतरंग' या पुस्तकाची पहिली प्रत राष्ट्रपती यांना प्रदान करण्यात आली. सदर भेटी दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais), ग्रामविकास मंत्री दादा भुसे, ज्योतीताई राठोर, जयेश राठोर, अँड प्रताप परदेशी आणि विनित परदेशी आदी उपस्थित होते.
रुग्णालयाच्या अमृत महोत्सवाचे उद्घाटन होणार : केवळ महाराष्ट्रच नव्हे तर मध्य भारताच्या अनेक राज्यांचे विश्वासार्ह, खात्रीलायक, किफायतशीर उपचाराचे केंद्र असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (जीएमसी) अमृत महोत्सवासाठी सज्ज झाले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या १ डिसेंबर रोजी शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अमृत महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडणार आहे.