महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

TET Scam Case : टीईटी घोटाळा प्रकरणातील 7900 अपात्र उमेदवारांची पत्यासह यादी तयार

टीईटी घोटाळा प्रकरणात (TET Scam Case) अनेक उमेदवारांनी चुकीच्या पद्धतीने परीक्षा देत पात्र झाल्याचे प्रमाणपत्र मिळवले होते. अशा उमेदवारांची संख्या तब्बल 7 हजार 900 आहे. या उमेदवारांची पत्यासह यादी तयार केली आहे. त्यांच्यावर लवकरच कारवाई होणार आहे.

TET Scam Case
TET Scam Case

By

Published : Feb 9, 2022, 10:51 AM IST

पुणे :टीईटी घोटाळा प्रकरणात टीईटी परीक्षेत (Teacher Eligibility Test Exam ) गैरमार्गाचा अवलंब करीत लाखो रुपये देऊन तब्बल 7 हजार 900 जणांनी (Ineligible candidate in TET scam case) पात्र झाल्याचे प्रमाणपत्र मिळविले आहे. पुणे सायबर पोलिसांनी या 7900 जणांची पत्यासह यादी तयार केली आहे. अपात्र उमेद्वारांविरुद्ध कारवाईसाठी पुणे सायबर पोलीस तयार आहे. त्यामुळे लवकरच या 7900 अपात्र उमेदवारांवर कारवाई करण्यात येणार आहे.

28 मार्क असताना चक्क अंतिम निकालात 82 मार्क दिले -

टीईटी (Teacher Eligibility Test) घोटाळा प्रकरणाचे जाळे हे दिवसंदिवस वाढतच चालले आहे. टीईटी परीक्षेत तब्बल 7900 अपात्र उमेदवारांनी पैसे देऊन पात्रता मिळविली आहे. या उमेदवारांना ओएमआर शीट मध्ये 28 मार्क असताना चक्क अंतिम निकालात 82 मार्क दिल्याचे उघडकीस आले आहे. तसेच या उमेदवारांना पात्र करण्यासाठी परीक्षेत प्रश्नपत्रिका सोडविताना कोडवर्ड देण्यात आला होता. विशेष म्हणजे एजंटला पैसे देणाऱ्याचं उमेदवारांनी उत्तरपत्रिकेवर काहीच प्रश्नांची उत्तरे सोडवायची ठरले होते. अश्या अनेक धक्कादायक बाबी सायबर पोलिसांनी उघडकीस आणल्या आहेत.

लवकरच होणार कारवाई -

पुणे सायबर पोलिसांनी ज्या 7900 अपात्र उमेदवारांची पत्यासह यादी तयार केली आहे. ती यादी पडताळणीसाठी शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आली आहे. यावर शिक्षण विभागाकडून खातरजमा केल्यानंतर अपात्र उमेदवारां विरुद्ध थेट कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details