महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गणेश प्रतिष्ठापनेसाठी पुण्यातील गणेश मंडळांची जय्यत तयारी - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

संपूर्ण  देशात प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी गणेश प्रतिष्ठापनाची जय्यत तयारी केली आहे. पुण्यातील पाच मानाच्या गणपती मंडळांची सोमवारी सकाळी साडेआठ ते साडेदहा दरम्यान प्रतिष्ठापनासाठीची मिरवणूक निघणार आहे.

गणेश प्रतिष्ठापनेसाठी पुण्यातील गणेश मंडळांची जय्यत तयारी झाली आहे.

By

Published : Sep 1, 2019, 3:42 PM IST

पुणे -अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या गजाननाच्या दहा दिवसाच्या गणेशोत्सवाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. या गणेशोत्सवाची जय्यत तयारी मंडळांकडून केली गेली आहे. तर संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी गणेश प्रतिष्ठापनाची जय्यत तयारी केली आहे.

गणेश प्रतिष्ठापनेसाठी पुण्यातील गणेश मंडळांची जय्यत तयारी झाली आहे.

हेही वाचा - अंध विद्यार्थिनींनी साकारला आपल्या मनातील बाप्पा

पुण्यातील पाच मानाच्या गणपती मंडळांची सोमवारी सकाळी साडेआठ ते साडेदहा दरम्यान प्रतिष्ठापनासाठीची मिरवणूक निघणार आहे. तर प्रसिद्ध गणेश मंडळ असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई मंडळाच्या गणपती, बाबू गेनू मंडळाचा गणपती, नातूबाग अशा प्रसिद्ध मंडळांच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना ढोल-ताशाच्या गजरात बँड पथकांच्या वादनात पारंपारिक वेशभूषेत मिरवणुकीने केली जाणार आहे.

हेही वाचा - शेंगा, दुधी भोपळा, नारळाच्या करवंटीतून साकारल्या गणेशाच्या मनमोहक कलाकृती

प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या बाप्पाची मिरवणूक सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंदिरातून निघणार असून मंडळाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना दुपारी साडेबारा वाजता केली जाणार आहे. मंडळाने यावेळी प्राणप्रतिष्ठापना मिरवणुकीसाठी शेषात्मज रथ तयार केला असून हा रथ फुलांनी सजवला जाणार आहे. त्यावरून बाप्पाची मिरवणूक निघणार आहे. एकंदरीतच पुण्यातील प्रमुख मंडळांसह इतरही मंडळांनी गणेश प्रतिष्ठापनेसाठी जय्यत तयारी केली आहे.

हेही वाचा - विद्यार्थ्यांनी साकारले बांबूपासून 'बाप्पा', बांबू संशोधन केंद्राचा अभिनव उपक्रम

ABOUT THE AUTHOR

...view details