पुणे -विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर टीका करत औरंगाबादच्या नामांतराविषयी त्यांनी त्यांची भूमिका जाहीर करावी, असे मागणी केली आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे, अशी शिवसेनची भूमिका होती, तर ती त्यांनी लावून धरावी आणि त्याला आमचे पूर्ण समर्थन असेल. नावे बदलून काही साध्य होत नाही. मात्र, संभाजीनगर हे नाव अस्मिता आहे. औरंगाबाद, अहमदनगर आणि उस्मानाबाद शहरांचीदेखील नावे बदलली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया खडसेंना सिडी मिळत नाही का -
ईडी ही स्वायत्त संस्था आहे, मात्र, सातत्याने ईडीवर टीका केली जाते. आता एकनाथ खडसे यांना नोटीस आली आहे. खडसे म्हणाले होते की, ईडी लावली तर मी सीडी काढेन. मात्र, त्यांना आता सीडी मिळत नाही का, असा उपरोधिक प्रश्नही दरेकरांनी विचारला. तसेच भाजपच्या नेत्यांनाची ईडी चौकशी होत नाही, या आरोपात काहीही तथ्य नाही. माझी एकदा नव्हे दोनदा चौकशी करावी, मी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे, असेही त्यांनी म्हटले. सोबतच त्यांनी गृहमंत्र्याच्या कारभारवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
हेही वाचा - मासिक पाळीशी निगडीत वस्तूंवरील अतिरिक्त कर रद्द! ब्रिटनचा निर्णय