पुणे- आमच्या ताटात वाटणी नकोय, आमचे ताट आम्हालाच राहू द्या, अशी ओबीसी समाजाची मागणी आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे. पण, आमच्या ताटातील नको, अशी त्यांची मागणी आहे. हे मी सोशल मीडियावर वाचले आहे. सर्व मराठा समाजातील पुढाऱ्यांना माझे आवाहन आहे की मराठा आरक्षणाचा प्रश्न गुंतागुंतीचा करू नका. ओबीसीमध्ये हिस्सा मागण्याच्या भानगडीत पडू नका, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजातील नेत्यांना केले.
मराठा समाज फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. महाराष्ट्रात जरी 16 टक्के असला तरी देशात फक्त 2 टक्के आहे हे लक्षात घ्या. देशभरातील ओबीसी जर एकत्र आला तर मराठा समाजाला महाराष्ट्रात जे मिळणार आहे तेही मिळणार नाही. म्हणून सर्वेच्च न्यायालयाने स्थगिती दिली म्हणून घाबरून न जाता अंतिम सुनावणी आली की मुंबई उच्च न्यायालायाचा निर्णय सर्वोच्च न्यायालय आहे तसाच ठेवेल आणि निकाल मराठा समाजाच्याच बाजूंनी लागेल.
त्यामुळे मराठा समाजाने या प्रश्नांचा गुंता वाढवू नये. महाराष्ट्रातला ओबीसी म्हणतोय त्याला देशभरातील ओबीसींनी पाठिंबा द्यायला सुरुवात केली तर देशभरात आपण किती टक्के होतो हे आपण पाहिले पाहिजे. त्यामुळे मराठ्यांच सुरळीत चाललेले आंदोलन, त्यांची मागणी सर्वोच्च न्यायालय मान्य करण्याच्या परिस्थितीत आहे त्याला खो घालू नये, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.
'मराठा आरक्षणासाठी ओबीसीमध्ये हिस्सा मागण्याच्या भानगडीत पडू नका' - प्रकाश आंबेडकर बातमी
मराठा समाजाने आरक्षणाचा प्रश्न गुंतागुंतीचा करुन ओबीसीमध्ये हिस्सा मागण्याच्या भानगडीत पडू नये, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
अॅड. प्रकाश आंबेडकर