पुणे- हे सरकार मस्तावलेले बेलगाम घोडा आहे. त्याला पकडण्याची गरज असून त्याला वठणीवर आणावे लागेल, अशी टीका वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. निवडणुका आल्यावरच देशाला धोका कसा असतो आणि निवडणुका संपल्या की सर्व शांतता कशी असते? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केली. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित सभेमध्ये बोलत होते.
यावेळी आंबेडकर म्हणाले, की खोट्या राष्ट्रवादात अडकू नका. अर्थव्यवस्था बिघडत चालली आहे. आणखी 5 नॅशनल बँका डुबणार आहेत. त्या डुबण्यापासून वाचवणे आपल्या हातात आहे. हे मस्तावलेले सरकार आहे, निवडणुकांचे निकाल अगोदरच जाहीर होत आहेत. जिंकणार आहात तर निवडणुका कशाला लढवत आहात, निवृत्त व्हा, असा टोलाही प्रकाश आंबेडकरांनी शिवसेना-भाजपला लगावला.