पुणे -ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ एफआरपीची रक्कम दिली जावी, या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयामध्ये आंदोलन करण्यात आले. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रहार संघटनेचे कार्यकर्त्यांनी चक्क साखर आयुक्त कार्यालयाच्या इमारतीवर चढून सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली.
ऊस एफआरपी प्रश्न: प्रहार संघटनेचे साखर आयुक्त कार्यालयावर चढून आंदोलन - frp
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ एफआरपीची रक्कम दिली जावी, या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयांमध्ये आंदोलन करण्यात आले.
रहार संघटनेचे आंदोलन
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आज प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. साखर कारखान्यांनी तातडीने एफआरपीची थकबाकी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी अनेक आंदोलक संघटनेचे झेंडे हातात घेऊन साखर आयुक्तालयाच्या इमारतीवर चढल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आमदार बच्चू कडू आणि साखर आयुक्त बच्चू कडू यांच्यात बैठक सुरू आहे.