पुणेPradeep Kanse On Rupali Chakankar :रुपाली चाकणकर या राजकीय दबाव वापरून विचारधारेच्या लढाईला व्यक्तिगत लढाई करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा आरोपी कणसे यांनी केला आहे. (Sambhaji Brigade regional organizer) आपल्या विरोधात लढणाऱ्या व्यक्तीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करून खोट्या गुन्ह्यात अडकून आपला राजकीय फायदा करून त्या घेत आहेत. सगळा प्रकार अशा पद्धतीने होत आहे की, त्यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला होता; परंतु यात माझा काही संबंध नाही अशी प्रतिक्रिया प्रदीप कणसे यांनी दिली आहे. (Pradeep Kanse Pune PC)
बलिप्रतिपदा पाडव्याच्या शुभेच्छावरून झाला वाद :दिवाळीच्या बलिप्रतिपदा या दिवशी रgपाली चाकणकर यांच्या फेसबुक पेजवरून बलिप्रतिपदा पाडव्याच्या शुभेच्छा देणारी पोस्ट करण्यात आली होती. संबंधित पोस्टमध्ये जे चित्र डिझाईन करण्यात आलं होतं त्यामध्ये वामन हा सम्राट बळीराजाच्या डोक्यावर पाय देत असल्याचं दाखवलं होतं. या चित्रामुळं सम्राट बळीराजाला श्रद्धास्थान मानणाऱ्या माझ्यासहित बहुजन समाजातील शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेत काम करणाऱ्या लाखो लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्यात. त्यामुळे 14 नोव्हेंबरला मी माझ्या प्रदीप कणसे या फेसबुक अकाउंट वरून यांचं सोशल मीडिया कोण हाताळते व चित्र काय दर्शवते याचं आकलन करणारी सामाजिक पोस्ट केली होती. यात कुठेही मी त्यांची बदनामी केली नाही. परंतु आपल्या विरोधात बोलणाऱ्याला अडकवण्यासाठी रुपाली चाकणकर यांनी कुठल्यातरी जुन्या गुन्ह्याचा संबंध माझ्याशी आहे का, हे पाहण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला आणि मला नोटीस पाठवली, असा आरोप कणसे यांनी केला आहे.