महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री, पाच विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना लुटणाऱ्या पाच विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तीन किराणा दुकानदार, एक मेडिकल आणि एका गॅस एजन्सीचा समावेश आहे. सर्वजण जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री करत होते

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

By

Published : Apr 3, 2020, 11:53 AM IST

पुणे - लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना लुटणाऱ्या पाच विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तीन किराणा दुकानदार, एक मेडिकल आणि एका गॅस एजन्सीचा समावेश आहे. सर्वजण जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री करत होते. याबाबतची माहिती मिळताच गुन्हे शाखेने छापा टाकून कारवाई केली.

अजूनही पोलीस अनेक ठिकाणी छापा टाकत असून कारवाईत वाढ होणार आहे. बाणेरला पुनाजी चौधरी हा दुकानदार पंचरत्न सुपर मार्केटमध्ये चढ्या दराने धान्य विक्री करत होता. शेंगदाणे 180 रुपये किलो, तूरडाळ 160 रुपये, मुगडाळ 155 रुपये, चणाडाळ 140 रुपये किलो अशा दराने विकत होता. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

खडकी बाजारातील गौरव अग्रवाल हा बीएम अग्रवाल किराणा जनरल स्टोअर या दुकानात शेंगदाणे 140 रुपये किलो, गोटा खोबरे दोनशे वीस रुपये किलो या भावाने विकत होता. त्यामुळे या दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचबरोबर होम लिंक इंटरप्राईजेसचा मालक भूपेश गुप्ता आणि रोहन शुक्ला यांच्यावरही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून चार लाख 30 हजार रुपयाचे 70 हजार 805 मास्क जप्त केले. त्यांच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

टिळक रोडला अग्रज फुड प्रोसेसर या दुकानावर छापा टाकला असता दुकानाचे मालक बाळकृष्ण थत्ते हे वाढीव दराने विक्री करत असल्याचे आढळून आले. तर चंदन नगर परिसरात वडगाव शेरीला 796 रुपयाचा घरगुती गॅस सिलेंडर 1000 रुपये दराने विकला जात होता. या प्रकरणी अमित गॅस एजन्सीचा मालक अमित गोयलवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून ३३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details