पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण - Pimpri-Chinchwad corona update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात १७ जण कोरोनाबाधित आहेत. पैकी, १३ जण हे कोरोनामुक्त झाले असून ते कामावर रुजू झाले आहेत. तर, चार जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, पोलीस आयुक्तालयातील दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन केले जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड (पुणे) - पोलीस आयुक्तालयात आज दोन वरिष्ठ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तालयातील ऐकून कोरोनाबाधितांची संख्या १७ वर पोहचली असून पैकी १३ जण बरे झाले आहेत. त्यातील काही जण कर्तव्यावर देखील रुजू झाले आहेत. दिवसरात्र आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनाच आता कोरोनाची लागण होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात १७ जण कोरोनाबाधित आहेत. पैकी, १३ जण हे कोरोनामुक्त झाले असून ते कामावर रुजू झाले आहेत. तर, चार जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात जनतेचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांना लागण होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
पोलीस आयुक्तालयातील दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन केले जाणार आहे.