महाराष्ट्र

maharashtra

खबरदार..! विनाकारण घराबाहेर पडाल तर होणार कारवाई; पोलीस ठेवतायेत ड्रोन क‌ॅमेऱ्यातून नजर

By

Published : Apr 2, 2020, 10:06 AM IST

कोरोना विषाणू आता ग्रामीण भागातही पाऊल टाकत आहे. सणसवाडीतमध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे. मात्र, नागरिकांमध्ये अजून कोरोनाबाबत गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे.

police-look-through-drone-cameras-in-pune
विनाकारण घराबाहेर पडाल तर होणार कारवाई

पुणे- जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोना विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. नागरिकांनी घरातच बसावे, काळजी घ्यावी, असे प्रशासन वारंवार आवाहन करत आहे. मात्र, काही नागरिक घराबाहेर येत आहेत. त्यामुळे आता घराबाहेर पडणाऱ्यांवर शिक्रापूर, सणसवाडी परिसरात ड्रोन क‌ॅमेराच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. तर विनाकारण रस्त्यावरती फिरणाऱ्या 3 जणांसह दोन दुचाकी व एका कारवर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

विनाकारण घराबाहेर पडाल तर होणार कारवाई

हेही वाचा-धक्कदायक..! घशात चॉकलेट अडकल्याने गुदमरून चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

कोरोना विषाणू आता ग्रामीण भागातही पाऊल टाकत आहे. सणसवाडीतमध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे. मात्र, नागरिकांध्ये अजून कोरोनाबाबत गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये. कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाला साथ द्या, असे आवाहन पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी केले आहे.


दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारून लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज नववा दिवस आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details