पुणे - अयोद्धेतील राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा आज(बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत साजरा झाला. या सोहळ्याचा संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा होत असताना क्रांतीकारक हुतात्म्यांची जन्मभूमी असलेल्या राजगुरुनगरमधील प्रत्येक मंदिरात 10 मिनिटे घंटानाद होणार होता. मात्र, पोलिसांनी अचानक सकाळी मंदिर बंद केल्याने राजगुरुनगर वासियांना या आनंदोत्सवात सहभाग नोंदविता आला नाही. त्यामुळे हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख यांनी राज्य सरकारच्या आदेशावर खंत व्यक्त केली.
राजगुरुनगरवासियांच्या आनंदोत्सवात विरजण, पोलिसांनी मंदिरे केली बंद - राजगुरुनगर पोलीस बातमी
क्रांतीकारक हुतात्म्यांची जन्मभूमी असलेल्या राजगुरुनगरमधील प्रत्येक मंदिरात राम मंदिर भूमिपूजनाच्या सोहळ्यानिमित्त 10 मिनिटे घंटानाद होणार होता. मात्र, पोलिसांनी अचानक सकाळी मंदिर बंद केल्याने राजगुरुनगर वासियांना या आनंदोत्सवात सहभाग नोंदविता आला नाही. त्यामुळे हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख यांनी राज्य सरकारच्या आदेशावर खंत व्यक्त केली.
शेकडो वर्षांचे स्वप्न पूर्ण होत असताना राजगुरुनगर व परिसरातील मंदिरांमध्ये एका व्यक्तीच्या उपस्थितीत आज 10 मिनिटे घंटानाद करण्यात येणार होता. मात्र, आज सकाळपासूनच क्रांतीकारक हुतात्मा राजगुरुंच्या जन्मभूमीत पोलिसांनी शासनाच्या आदेशानुसार राजगुरुनगर व परिसरातील सर्व मंदिरे बंद केली होती. त्यामुळे कुठल्याच मंदिरात घंटानाद करता आला नाही. राम मंदिराच्या या भव्य भूमिपूजन सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा करता न आल्याने भाजप व हुतात्मा राजगुरू स्मारक समितीच्या वतीने राज्य सरकारच्या आदेशाबाबत खंत व्यक्त करण्यात आली. अयोध्येत भूमिपूजन सोहळा संपन्न होत असताना राजगुरुनगर येथील मंदिर बंद करण्यात आल्याने राजगुरुनगर शहरात घरात गुढी उभारुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.