पुणे -महाविद्यालयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ही घटना शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे घडली. यामध्ये या तरुणाला पोलिसांकडून बेदम मारहाण होत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओची तपासणी करून चौकशी सुरु असल्याचे शिरुर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी सांगितले.
शिरुरमध्ये महाविद्यालयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी पोलिसांकडून तरुणाला बेदम मारहाण
महाविद्यालयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये या तरुणाला पोलिसांकडून बेदम मारहाण होत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओची तपासणी करून चौकशी सुरु असल्याचे शिरुर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी सांगितले.
योगेश खले असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. पीडित तरुणी व योगेश हे दोघेही शिरुर तालुक्यातील महाविद्यालयात एकत्र शिक्षण घेत आहेत. योगेशकडून अनेकवेळा पीडित मुलीची छेडछाड होत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी योगेशला मांडवगण फराटा येथील आऊटपोस्टला बोलावून तंबी दिली. मात्र, त्याच ठिकाणी योगेशला पोलिसांनी खुप मारल्याचे योगेशने सांगितले.
योगेश खले या तरुणाला मारहाण झाल्याचा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर शिरुर पोलिसांकडून योगेशवर पीडित तरुणीच्या तक्रारीवरून महाविद्यालयीन तरुणीची वारंवार छेडछाड केली जात असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपी योगेशला पोलीस खुप मारत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. त्यामुळे पोलिसांवर नाराजीचा सुर उमटत आहे. याबाबत वायरल झालेल्या व्हिडीओची वरिष्ठ पातळीवर तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक नारायण सारंगकर यांनी माध्यांशी बोलताना सांगितले.