महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दोन वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक - अपहरण

२३ मार्चला पुष्कराज हा वडाची वाडी येथील घराच्या आवारात खेळत असताना आरोपीने त्याचे अपहरण केले होते. पोलिसांनी संपूर्ण उंद्री परिसर पिंजून काढत एका बांधकाम साईटवरून पुष्कराजला ताब्यात घेतले होते.

दोन वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक

By

Published : Mar 28, 2019, 7:27 PM IST

पुणे - दहा लाखाच्या खंडणीसाठी कोंढवा परिसरातून दोन वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विकास रामभवन चौव्हाण (वय २०, रा.उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. त्याने १० लाखाच्या खंडणीसाठी वडाची वाडी येथून पुष्कराज धनवडे या दोन वर्षीय मुलाचे अपहरण केले होते.

दोन वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक

२३ मार्चला पुष्कराज हा वडाची वाडी येथील घराच्या आवारात खेळत असताना आरोपीने त्याचे अपहरण केले होते. घराच्या आवारात एका चिट्ठीत नंबर लिहून ठेवला होता. त्या नंबरवर पुष्कराजच्या कुटुंबीयांनी फोन केला असता समोरून पुष्कराजचे अपहरण केल्याचे सांगत आणि १० लाखाची खंडणी मागितली होती.

प्रकरण पोलिसात गेल्यानंतर पोलीसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपींचा शोध सुरू केला. मोबाईल लोकेशनवरून आरोपी उंद्री परिसरातच असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण उंद्री परिसर पिंजून काढत एका बांधकाम साईटवरून पुष्कराजला ताब्यात घेतले होते. या प्रकरणातील आरोपी पसार झाला होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांना आरोपी मांजरी परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहिती नुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर उत्तर प्रदेशात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. यापूर्वीही त्याने दोनदा लहान मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रयत्नात तो अपयशी ठरला होता. यानंतर त्याने टेहळणी करून पुष्कराजचे अपहरण केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details