महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune Suicide News: एकाच कुटुंबातील तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न; वडिलांचा मृत्यू, दोघांवर उपचार सुरू - Suicide Attempt

पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आई, वडील आणि मुलाने विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आईला कॅन्सर होता तर मुलाला फीट येत होते. या आजाराला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचले आहे.

Pune Suicide News
आत्महत्येचा प्रयत्न

By

Published : May 22, 2023, 9:49 PM IST

पुणे : पुण्यातील हडपसर येथे आजारपणाला कंटाळून एकाच कुटुंबातील तिघांनी विषारी औषध प्राशन केले. त्यातील एकाचा मृत्यू झाला असून दोघांवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहे. सूर्यप्रकाश अबनावे (७२), चेतन अबनावे (४०) आणि जनाबाई अबनावे (६०) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहे. पुण्यातील हडपसर येथे लक्ष्मी निवास, भोसले व्हिलेज, फुरसुंगी, हडपसर येथे ते राहता होते.

पतीचा जागीच मृत्यू: सूर्यप्रकाश हरिश्चंद्र अबनावे (70 वर्षे), जनाबाई सूर्याप्रकाश अबनावे (60 वर्षे), चेतन सूर्यप्रकाश अबनावे (41 वर्षे) यांनी त्यांचे राहते घरी दरवाजा बंद करून, विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी सूर्यप्रकाश हरिश्चंद्र अबनावे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी आणि मुलगा यांना पुढील उपचारासाठी ससून हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलेले आहे.



आजाराला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न: याबाबत प्राथमिक माहिती अशी की, मुलगा चेतन अबनावे हा स्वतः आजारी असायचा त्याला अनेक वेळा फीट येत होती. शिवाय त्याच्या आईला देखील कॅन्सर होता. याच आजारपणाला कंटाळून या तिघांनी जीवन संपवायचे ठरवले.आज संध्याकाळी तिघांनी हडपसर येथील राहत्या घरी त्यांनी जेवणातून विषप्राशन करत, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात वडिलांचा मृत्यू झाला तर आई आणि मुलगा हे शेजारच्यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले. शेजारी राहत असलेल्या नागरिकांनी घटना घडताच त्यांना रुग्णालयात दाखल केल आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

आत्महत्या करण्याचा प्रयत्न: याआधीही अशीच एक घटना घडली होती. शहरात कौटुंबिक वादातून खून केल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अश्यातच पुण्यातील हडपसर येथे एक धक्कादायक बाब घडली होती. कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता पळून जाऊन प्रेमविवाह केलेल्या तरुणीचा तिच्या नवऱ्याने खून केल्याची घटना घडली होती. यानंतर नवऱ्याने देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

हेही वाचा -

  1. Khadakwasla dam खडकवासला धरणात 9 मुली बुडाल्या 7 जणांना पाण्यातून बाहेर काढण्यात यश दोघींचा मृत्यू
  2. IT Engineer Murder Case Pune आयटी इंजिनियरची 3 हजार रुपयांसाठी केली हत्या दोन आरोपींना अटक
  3. Student Suicide एका मित्राकडून उसने पैसे घेऊन दुसऱ्याला दिले दुसऱ्याने दिला दगा त्याची आत्महत्या

ABOUT THE AUTHOR

...view details