महाराष्ट्र

maharashtra

PMPML Reward Scheme: बेशिस्त ड्रायव्हर व कंडक्टरची तक्रार करा अन् मिळवा बक्षीस, पीएमपीएलची प्रवाशांसाठी भन्नाट स्किम

By

Published : Jul 13, 2023, 12:47 PM IST

पुण्यात पीएमपीएलचा बेशिस्त कारभार आता सर्वांच्या परिचयाचा झाला आहे. कधी बसची चोरी तर कधी ड्रायव्हर, कंडक्टरच्या हलगर्जीपणामुळे अपघात या घटना पुणेकरांना नवीन नाही. याला आळा घालण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने आता एक शक्कल लढविली आहे. बेशिस्त ड्रायव्हर व कंडक्टरची पुराव्यासह तक्रार करणाऱ्या प्रवाशांना शंभर रुपये बक्षीस मिळणार आहे.

PMPML Reward Scheme
पीएमपीएमएल

पुणे :पुणे आणि पीएमपीएमएलचे एक वेगळेच नाते आहे. नेहमी तोट्यात आणि चर्चेत आलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाने आता थेट प्रवाश्यांनाच बक्षीस देण्याचे निर्णय घेतला आहे. पीएमपीएमएलमधून प्रवास करत असताना जर ड्रायव्हर किंवा कंडक्टर हे बेशिस्त वर्तन करत असतील, तसेच नियम मोडत असतील, तर त्याची तक्रार केल्यास प्रवाश्यांना शंभर रुपये बक्षीस मिळणार आहे. संबंधित ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना एक हजार रूपये दंड लावण्यात येणार आहे.


प्रवाशांसाठी बक्षीस योजना :पुणे महानगर परिवहन महामंडळाला ड्रायव्हर कंडक्टर यांच्या बेशिस्त वर्तनाबाबत नागरीक, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांच्याकडून तक्रारी आणि सूचना प्राप्त होत असतात. या तक्रारीमध्ये प्रामुख्याने ड्रायव्हिंग करत असताना मोबाईलवर बोलणे, बसला रूट बोर्ड नसणे किंवा चुकीचे बोर्ड असणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबवणे, अशा तक्रारींचा समावेश आहे. महामंडळाकडील ड्रायव्हर कंडक्टर सेवकांच्या गैरवर्तनाबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण होण्याच्या दृष्टीने महामंडळाने पुराव्यासह तक्रार करणाऱ्या प्रवाशांसाठी बक्षीस योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.


ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना दंड : ड्रायव्हिंग करताना मोबाईलचा वापर करणे, मोबाईल कानाला लावून अगर हेडफोनद्वारे बोलणे सुरक्षिततेच्या दृष्टीने हिताचे नाही. तसेच बसला रूट बोर्ड नसणे, चुकीचा रूट बोर्ड असणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबवणे, यामुळे प्रवाशी व नागरिकांची गैरसोय होते. ड्रायव्हिंग करतेवेळी ड्रायव्हर मोबाईलचा वापर करत असल्यास व मोबाईल कानाला लावून किेवा हेडफोनद्वारे बोलत असेल. तसेच बसला रूट बोर्ड नसणे, चुकीचा रूट बोर्ड असणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबवणे, असे प्रकार प्रवासी किंवा नागरिकांना आढळून आले तर संबंधित ड्रायव्हर आणि कंडक्टर सेवकास एक हजार रुपये इतका दंड आकारण्यात येणार आहे. तसेच याची तक्रार केल्यावर त्याची शहानिशा करून तक्रारदार प्रवासी किंवा नागरिकांना शंभर रुपये बक्षीस रोख स्वरुपात मिळणार आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून आवाहन : प्रवासी किंवा नागरिकांनी अशा ड्रायव्हर कंडक्टर यांच्या तक्रारी बाबतचे फोटो तसेच व्हिडीओ, बस क्रमांक, मार्ग क्रमांक, ठिकाण, दिनांक व वेळ महामंडळाच्या मेलवरती किंवा ९८८१४९५५८९ या व्हॉटसअ‍ॅप क्रमांकावरती पाठवावे. महामंडळाच्या नजीकच्या डेपोमध्ये पुराव्यासह तक्रारी सादर करावे, असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा :

  1. PMPML Bus accident, पीएमपीएमएल बसने अनेक वाहनांना दिली धडक, पाहा व्हिडिओ
  2. PMPML Driver Assaulted पीएमपीएमएल चालकाला दुचाकी स्वाराकडून मारहाण, पाहा व्हिडियो
  3. PMPML Contractors Strike : 'पीएमपीएमएल'च्या ठेकेदारांचा अचानक संप; प्रवाशांची गैरसोय

ABOUT THE AUTHOR

...view details