पुणे- शहरात संचारबंदी असूनही वाहतूक सेवा देणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बससेवेला बंदी घालण्यात आली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी थेट स्वारगेट येथील पीएमपीएलच्या मुख्यालयात जाऊन बससेवा बंद केली आहे. याप्रकरणी मोहोळ यानी वारंवार विविध माध्यमातून पीएमपीएलला बससेवा बंद करण्याचे आवाहन केले होते. मात्र, बससेवा सुरूच असल्याने महापौरांनी सदर पवित्रा घेतला.
पुणे महापौरांनी थेट मुख्यालयात जाऊन बंद केली पीएमपीएमएल बससेवा - mayor murlidhar mohol
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पीएमपीएलच्या अध्यक्ष नयना गुंडे यांना वस्तुस्थिती आणि नागरिकांच्या मागणीची माहिती देत सेवा बंद करण्याची सूचना केली. त्यावर अध्यक्षा गुंडे यांनी निर्णय घेत सायंकाळी पाचपासून बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापौर मोहोळ यांनी पीएमपीएलच्या अध्यक्ष नयना गुंडे यांना वस्तुस्थिती आणि नागरिकांच्या मागणीची माहिती देत सेवा बंद करण्याची सूचना केली. त्यावर अध्यक्षा गुंडे यांनी निर्णय घेत सायंकाळी पाचपासून बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी संचालक हेमंत रासणे, शंकर पवार उपस्थित होते. पुण्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंताजनक असून मी आधीपासूनच सार्वजनिक बस सेवा बंद करण्यासाठी प्रयत्न करत होतो. कोरोनाच्या आपण दुसऱ्या टप्प्यात असलो तरी तिसऱ्या टप्प्याची भीती आपल्या सर्वांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर वेळीच पावले उचलणे अपेक्षित आहेत. त्यानुसार निर्णय घेऊन बससेवा बंद करण्यात आली आहे. बससेवा सुरू असणे म्हणजे नागरिकांना शहरात वावरण्यासाठी एक प्रकारचे प्रोत्साहनच होते, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले.