महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

PM Modi Invite Baramati Farmer : अजित पवारांच्या बांधाला बांध असणाऱ्या शेतकऱ्याला पंतप्रधानांचे निमंत्रण; काय आहे प्रकरण?

दिल्लीतील स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला (Independence Day celebrations in Delhi) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी बारामतीतील शेतकऱ्याला निमंत्रण दिले आहे. अशोक सुदाम घुले असे या शेतकऱ्याचे नाव (Prime Minister invitation to Ashok Ghule for Independence Day celebrations) आहे. घुले यांची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या शेतीला लागूनच शेती आहे.

Pm Modi Invite Baramati Farmer
घुले दाम्पत्य

By

Published : Aug 13, 2023, 5:25 PM IST

बारामती(पुणे) : उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या बांधाला बांध असणाऱ्या शेतकऱ्याला चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी स्वातंत्र्य दिनाच्या सोह्ळ्याला (Independence Day 2023) निमंत्रण दिले आहे. अशोक घुले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला (Independence Day Events in Delhi) निमंत्रण दिलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. अशोक घुले हे ढेकळवाडी येथील राहणारे आहेत. विशेष म्हणजे अशोक घुले हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. मात्र त्यांनी आपल्या शेतात भरघोस पीक घेतले आहे.

अशोक सुदाम घुले यांच्याकडे साठ गुंठे शेती : ढेकळवाडी गावातील अल्पभूधारक शेतकरी अशोक सुदाम घुले यांची गावात साठ गुंठे शेती आहे. बारामती परिसर हा पुणे जिल्ह्यातील कमी पावसाचा प्रदेश म्हणून गणला जातो. या परिसरात पावसाची कमतरता असल्याने येथे बाजरी, मका, सोयाबीन इत्यादी पिके घेतली जातात. घुले यांनी शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेळीपालनही सुरु केले. त्यांनी शेतात बाजरी, सोयाबीन, मका, ऊस, इत्यादी पिके घेतली. अशोक घुले यांचे संपुर्ण कुटुंब शेती व्यवसाय करतात. यातून त्यांना चांगले उत्पन्नही मिळत आहे.

अशोक घुले यांचा विशेष सन्मान : अशोक घुले यांना पंतप्रधान कृषी सन्मान निधीतून प्रत्येकी दोन हजार रुपयांचे चौदा हफ्ते त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. रक्कम जरी छोटी असली, तरी या रकमेचा फायदा त्यांना खते, शेतीला लागणाऱ्या इतर गोष्टीसाठी झाला. त्यांनी या योजनेबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. १५ ऑगस्टला दिल्लीतील लाल किल्ला येथील कार्यक्रमात अशोक घुले यांच्यासह त्यांच्या पत्नीला पंतप्रधान कार्यालयाच्यावतीने निमंत्रण देण्यात आले आहे. यावेळी त्यांचा विशेष सन्मानही करण्यात येणार आहे.

अन् पत्नीला दिल्लीला फिरण्यास नेण्यात यश आले : घुले यांनी घरामध्ये गमतीने पत्नीला तुला कुठे फिरायला जायचे आहे, अशी विचारणा केली. त्यावर पत्नीने उपरोधाने मला दिल्लीला नेता का? असे उत्तर दिले. त्यानंतर घुले यांनी पत्नीला दिल्लीतील कार्यक्रमासाठी निमंत्रण आल्याचे सांगितले. सहजपणे पत्नीने व्यक्त केलेली इच्छा यानिमित्ताने पूर्ण होत असल्याचे अशोक घुले यांनी सांगितले. तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी निवड झाल्याची माहिती घुले यांना दिली आहे.

केंद्राची योजना फायद्याची : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली ही योजना अत्यल्प, अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. परंतु खते-बियाण्यांचे दर वाढत चालले आहेत. मोदी सरकारने या योजनेत किमान एक हजार रुपयांची वाढ केली पाहिजे, अशी अपेक्षा अशोक घुले यांनी व्यक्त केली.

हेही वाचा -

  1. Independence Day: पंतप्रधान मोदींनी बदलला सोशल मीडियावरील प्रोफाइल फोटो;'हर घर तिरंगा' मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन
  2. Ajit pawar Sharad Pawar Meeting : अजित पवार यांनी शरद पवार यांना काय दिला प्रस्ताव? दोन्ही नेत्यांची आणखी भेट होण्याची शक्यता
  3. Independence Day : देशाच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरू: दिल्लीत जवानांची कवायत, काश्मीरमध्ये 'हर घर तिरंगा' रॅलीचे आयोजन

ABOUT THE AUTHOR

...view details