महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

PM Modi Dehu Visit : देहू संस्थानाने निर्णय बदलला; पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त तीन नाहीतर एकच दिवस मंदिर बंद - पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू दौरा

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त ( PM Modi Dehu Visit ) तीन दिवस देहूतील मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हा निर्णय मंदिर संस्थानाने मागे घेतला आहे. 14 जूनलाच मंदिर बंद राहणार ( Sant Tukaram Maharaj Mandir Closed 14 June ) आहे.

Dehu mandir
Dehu mandir

By

Published : Jun 12, 2022, 3:53 PM IST

Updated : Jun 12, 2022, 4:00 PM IST

पिंपरी-चिंचवड -संत तुकाराम महाराज मंदिर तीन दिवस दर्शनासाठी बंद राहणार असल्याचा निर्णय देहू संस्थानाने मागे घेतला आहे. भाविकांची गैरसोय आणि समाज माध्यमांवर प्रतिक्रिया उमटत असल्याने संस्थानाने त्यांचा निर्णय बदलला आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमित्त ( PM Modi Dehu Visit ) एकच दिवस ( 14 जून ) मंदिर बंद राहणार असल्याची ( Sant Tukaram Maharaj Mandir Closed 14 June ) माहिती, संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्री मोदी हे देहून ते येणार आहेत. त्यांच्या हस्ते शिळा मंदिर आणि जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या मुर्तीचे लोकार्पण होणार आहे. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर तीन दिवस बंद ठेवणार असल्याचे देहू संस्थानाचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी सांगितले होते.

नितीन महाराज मोरे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

याबाबत नितीन महाराज मोरे यांनी म्हटलं की, पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या निमित्ताने स्वच्छतेची काम सुरु आहे. मात्र, बाहेर राज्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, त्यांच्या गैरसोय होवू नये म्हणून मंदिर एक ते दोन तास दर्शन थांबवण्यात येईल. 14 जूनला मंदिर पूर्णपणे बंद राहिल, अशी माहितीही नितीन महाराज मोरे यांनी दिली आहे.

हेही वाचा -Dedication Of Tukaram Maharaj Shila Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार जगद्गुरु तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण

Last Updated : Jun 12, 2022, 4:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details