बारामती -तालुक्यातील शिर्सुफळ येथील गावात शिरसाई कालव्याची जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वायाला गेले. लोकवस्तीपासून दूर अंतरावर ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, शेतकऱ्यांचा मुरघास, जनावरांच्या गोठ्यात व घरात पाणी शिरले. शेळ्या व कोंबड्या पाण्यात वाहून गेल्या. रस्त्याच्या कडेला असलेल्या चारचाकी वाहनात पाणी शिरल्याने अनेक गाड्या बंद पडल्या.
शिर्सुफळला येथील शिरसाई योजनेची पाइपलाइन फुटली, अनेकांच्या घरात शिरले पाणी - शिरसाई योजनेची पाईप लाईन फुटली
शिर्सुफळला येथील शिरसाई योजनेची पाइपलाइन फुटली आहे. या घटनेमुळे अनेक घरात पाणी शिरले.
शिरसुफळ येथील रेल्वे लाईन जवळ जलवाहिनी फुटली -
बारामती तालुक्यातील जिरायती भागातील गावांसाठी शिरसाई योजनेचा फायदा होत असतो. आज सकाळी नऊच्या सुमारास शिरसुफळ येथील रेल्वे लाइनजवळ जलवाहिनी फुटल्याने मोठा आवाज झाला. पाण्याच्या प्रेशरने पाइपलाइन फुटली. पाईपलाईनमधून निघणारे पाणी आकाशाकडे उंचच्या उंच उडत होते. पाण्याला प्रचंड वेग असल्याने हे पाणी नागरी वस्तीत येऊन अनेकांच्या घरात अंगणात गोठ्यात शिरून मोठे नुकसान झाले आहे. सध्या गावात पूरजन्य परिस्थिती असल्याचे दिसत आहे.