महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडकरांना मान्सूनपूर्व पावसाने झोडपले - pune rain update

शहराला रेड झोनमधून वगळल्यानंतर दुकाने सुरू करण्यास सशर्त परवानगी दिलेली आहे. त्यामुळे अनेक नागरिक हे सायंकाळच्या सुमारास खरेदी करण्यासाठी बाहेर पडतात. तेव्हाच पावसाने सर्वांना झोडपून काढले.

pimpri-chinchwad was hit by pre monsoon rains
पिंपरी-चिंचवडकरांना मान्सूनपूर्व पावसाने झोडपले

By

Published : Jun 2, 2020, 9:52 PM IST

मुंबई- पिंपरी-चिंचवड शहराला सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. पिंपरी-चिंचवड शहर हे रेड झोनमधून वगळण्यात आले असल्याने अनेक नागरिक हे घराबाहेर पडतात. यामुळे सायंकाळी सातच्या सुमारास आलेल्या पावसाने अनेकांची धावपळ झाली.

पिंपरी-चिंचवडकरांना मान्सूनपूर्व पावसाने झोडपले
गेल्या दोन दिवसांपासून पिंपरी-चिंचवडसह परिसरात ढगाळ वातावरण असून शहरात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, शहरातील काही भागातील वीज खंडित झाली होती. तर अनेक ठिकाणी खड्ड्याने पाणी साठले होते. नागरिकांना चालण्यासाठी कसरत करावी लागली आहे. मात्र, मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकरी सुखावला असून यावर्षी दमदार पाऊस पडेल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details