सांगा गणपती विसर्जन करायचे कुठे? शिवसेनेचे पालिकेमध्ये आंदोलन
विसर्जन घाट व पूर्वीचे महापालिकेने बांधलेले विसर्जन हौद बंद केले. शहरात फिरत्या हौदाची कोठेही व्यवस्था केली नाही. मूर्तीदान उपक्रमाचे ढिसाळ नियोजन, यामुळे सांगा गणपतीचे विसर्जन कुठे करायचे, असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला.
पुणे - पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोना परिस्थितीची जाणीव असतानाही गणेश विसर्जनाची कोणतीही सोय केली नाही. पालिकेच्या या ढिसाळ कारभाराविरोधात शिवसेनेने आज महानगर पालिकेच्या प्रवेशद्वारसमोर आंदोलन केले आहे.
विसर्जन घाट व पूर्वीचे महापालिकेने बांधलेले विसर्जन हौद बंद केले. शहरात फिरत्या हौदाची कोठेही व्यवस्था केली नाही. मूर्तीदान उपक्रमाचे ढिसाळ नियोजन, यामुळे सांगा गणपतीचे विसर्जन कुठे करायचे, असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन घाट, महानगर पालिकेने बांधलेले विसर्जन हौद हे बंद केले असून मूर्तीदान करण्याचे आवाहन महानगर पालिकेकडून करण्यात आले होते. परंतु, दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन झाल्यानंतर अनेक नागरिकांनी मूर्तीदान करण्यासाठी उपाययोजना नसल्याने विसर्जन घाटवर गेले. परंतु, तेथे पोलीस कर्मचाऱ्यांनी मज्जाव केल्याने गणपती विसर्जन करायचे कोठे असा प्रश्न गणेश भक्तांपुढे होता, असे जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे म्हणाले आहेत. त्यामुळे आज महानगर पालिकेच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन करत प्रभागनिहाय मूर्तीदान करण्यासाठी प्रतिनिधी निवडावा किंवा मोबाईल नंबर प्रसिद्ध करावेत अशी मागणी शिवसेने केली आहे.