महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणेकर क्रिकेटपटू ऋतुराजची IPL मध्ये तडाकेबंद कामगिरी, महापौरांनी कुटुंबियांना दिल्या शुभेच्छा - क्रिकेटर ऋतुराज गायकवाडचे कुटूंब न्यूज

आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाकडून यशस्वी खेळ करुन आपली वेगळी छाप पाडणारा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड पिंपरी-चिंचवड शहरातील जुनी सांगवीचा रहिवासी आहे. त्याने आयपीएलमध्ये सलग तीन अर्धशतक झळकावत केलेल्या खेळाने क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले आहे. त्याच्या कामगिरीचे कौतूक महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी ऋतुराजच्या पालकांना प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा देत केले.

Pimpri Chinchwad Mayor Usha Dhore meets the parents of cricketer Ruturaj Gaikwad
पुणेकर क्रिकेटपटू ऋतुराजची IPL मध्ये तडाकेबंद कामगिरी, महापौरांनी कुटुंबियांना दिल्या शुभेच्छा

By

Published : Nov 3, 2020, 8:04 AM IST

पुणे - आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाकडून यशस्वी खेळ करुन आपली वेगळी छाप पाडणारा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड पिंपरी-चिंचवड शहरातील जुनी सांगवीचा रहिवासी आहे. त्याने आयपीएलमध्ये सलग तीन अर्धशतक झळकावत केलेल्या यशस्वी खेळाने क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले आहे. त्याच्या कामगिरीचे कौतूक महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी ऋतुराजच्या पालकांना प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा देत केले.

सलग तीन सामन्यांत अर्धशतक

आयपीएल सामन्यामध्ये २३ वर्षीय ऋतुराजने सलग तीन सामन्यांत अर्धशतक झळकावले. आपली वेगळी छाप त्याने आयपीएलमध्ये पाडली आहे. चांगली कामगिरी केल्याने सचिन तेंडुलकर, चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांनीही त्याचे कौतुक केले.

महापौरांची भेट

पिंपरीच्या जुनी सांगवीमध्ये ऋतुराज गेली अनेक वर्षे राहत आहे. महापौर माई ढोरे यांनी सातत्याने खेळाडू म्हणून ऋतुराजला प्रोत्साहन दिले असल्याचे पालकांनी सांगितले. आयपीएलमधील त्याचा खेळ पाहून महापौरांनी त्याच्या पालकांना सदिच्छा भेट दिली. यावेळी महापौर माई ढोरे यांनी वडील दशरथ गायकवाड आणि आई सविता गायकवाड यांना भेट घेत ऋतुराजचे कौतुक केले.

शहराचे नाव उज्जवल केले

महापौर म्हणाल्या की, 'ऋतुराजचे आपल्या शहरात कुटुंब जुनी सांगवी येथे गेली २०–२५ वर्षे वास्तव्यास आहे. खेळाडू म्हणून त्याला घरच्यांनी चांगली साथ दिली आहे. तसेच खेळासाठी त्याने सातत्याने घेतलेले केलेले कष्ट आम्ही पाहिले आहेत. आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करत त्याने आपल्या शहराचे आणि आई-वडिलांचे नाव उज्ज्वल केले आहे.'

ABOUT THE AUTHOR

...view details