महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना बाधितांचा आकडा दीड हजार पार; नव्या १०४ रुग्णांची भर - पिंपरी चिंचवड कोरोना रुग्ण

पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी नव्याने १०४ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. या नव्या रुग्णांसह कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ५६९ वर पोहोचली आहे.

Pimpri Chinchwad: 104 new COVID patients detected in PCMC, 30 discharged
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना बाधितांचा आकडा दीड हजार पार; नव्या १०४ रुग्णांची भर

By

Published : Jun 20, 2020, 7:02 AM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी नव्याने १०४ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. या नव्या रुग्णांसह कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ५६९ वर पोहोचली आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये महानगर पालिकेच्या हद्दीबाहेरील रुग्णांचाही समावेश आहे. तर शुक्रवारी कोरोनामुळे एका रुग्णांचा मृत्यू झाला.

काळेवाडी येथील ४८ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. यासह आत्तापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ४८ इतकी झाली आहे. तसेच शुक्रवारी ३० जण कोरोना मुक्त झाले असून कोरोनामुक्त लोकांचा आकडा आकडा १ हजार ५८ झाला.

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना बाधितांचा आकडा दीड हजार पार...
शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे इंदिरानगर चिंचवड, खराळवाडी, साईचौक बोपखेल, समर्थनगर सांगवी, अष्टविनायक कॉलनी काळेवाडी, रिव्हर रोड पिंपरी, गांधीनगर पिंपरी, विठ्ठल नगर पिंपरी, संत तुकाराम नगर पिंपरी, बौध्दनगर, भाटनगर पिंपरी, पिंपरी, शिवतीर्थनगर काळेवाडी, सोनगिर विहार काळेवाडी, साईबाबा नगर चिंचवड, मोहननगर चिंचवड, मिलिंदनगर पिंपरी, सिध्दार्थनगर दापोडी, अजंठानगर, नाणेकर चाळ पिंपरी, तापकीर नगर काळेवाडी, जगताप डेअरी, पिंपळे सौदागर, मोरेवस्ती चिखली, निगडी, क्रांतीनगर आकुर्डी, मोरवाडी, वैदुवस्ती पिंपळे गुरव, खंडोबामाळ, तानाजीनगर चिंचवड, विद्यानगर चिंचवड, नवी सांगवी, पंचतारानगर आकुर्डी, घरकुल चिखली, दत्तनगर चिंचवड, तुळजाभवानी कॉलनी थेरगाव, यमुनानगर, दापोडी, शिवशक्ती चौक भोसरी, वैभावनगर पिंपरी, नाशिक फाटा काळेवाडी, बिजलीनगर चिंचवड, उद्यमनगर चिंचवड, गांधीनगर येरवडा, चिंचोली आंबेगाव आणि मंगळवार पेठ येथील रहिवासी आहेत.तर कोरोनामुक्त झालेले, साईबाबा नगर चिंचवड, शिंदेनगर जुनी सांगवी, दिघी, बेलठीका नगर थेरगाव, काळभोरनगर, भारतमातानगर पिंपरी, ममतानगर जुनी सांगवी, गुरुदत्तनगर पिंपरी, रमाबाईनगर पिंपरी, सिध्दार्थनगर दापोडी, आनंदनगर चिंचवड, जाधवनगर चिखली, बौध्दविहार पिंपरी, शाहुनगर चिंचवड, सद्गुरु कॉलनी वाडक, पत्राशेड पिंपरी, खेड आणि खडकी येथील रहिवासी रहिवाशी आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details