पुणे - पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ही परिस्थिती बघता रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सोमवारी 13 जुलै मध्यरात्रीपासून पुढील दहा दिवस लॉकडाऊन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुण्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी 10 जुलैला आढावा बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पिंपरी चिंचवड लॉकडाऊन; पाहा नवीन नियमावलीत काय राहणार सुरू, काय राहणार बंद - पिंपरी-चिंचवड लॉकडाऊन नियमावली
सोमवारी मध्यरात्रीपासून शहर लॉकडाऊन असणार आहे. 23 जुलैला रात्री 12 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असेल. या लॉकडाऊन दरम्यान किराणा दुकान, किरकोळ विक्रेते, सर्व व्यवसाय, भाजी मंडई, आठवडी बाजार, फेरीवाले, बांधकामाची कामे मंगल कार्यालये, धार्मिक स्थळे, सर्व खासगी कार्यालये पूर्ण बंद राहणार आहे. तर, कामगारांची दहा दिवस राहण्याची सोय करणारे उद्योग सुरू राहणार आहेत.
पिंपरी चिंचवड मनपा
निर्णयानुसार सोमवारी मध्यरात्रीपासून शहरात लॉकडाऊन असणार आहे. 23 जुलैला रात्री 12 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असेल. या लॉकडाऊन दरम्यान किराणा दुकान, किरकोळ विक्रेते, सर्व व्यवसाय, भाजी मंडई, आठवडी बाजार, फेरीवाले, बांधकामाची कामे मंगल कार्यालये, धार्मिक स्थळे, सर्व खासगी कार्यालये पूर्ण बंद राहणार आहे. तर, कामगारांची दहा दिवस राहण्याची सोय करणारे उद्योग सुरू राहणार आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील नियमावली -
- सर्व किराणा दुकाने, किरकोळ व ठोक विक्रेते, व्यापारी दुकाने 14 जुलै ते 18 जुलैपर्यंत पूर्णतः बंद राहतील.
- 19 जुलै ते 23 जुलै या कालावधीत सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने आणि त्यांचे ठोक विक्रेते यांची दुकाने सुरू राहतील.
- इतर सर्व दुकाने आणि अस्थापने बंद राहतील.
- फळ विक्रेते, आठवडी बाजार, फेरीवाले हे 14 ते 18 जुलैपर्यंत पूर्णतः बंद राहतील. त्यानंतर 19 जुलै ते 23 जुलै दरम्यान अधिकृत फळ, भाजी, फेरीवाले, आठवडी बाजार हे सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत सुरू राहतील.
- मटण, चिकन, अंडी, मासे इत्यादीची विक्री करणारे दुकाने 14 ते 18 जुलै बंद राहतील. त्यानंतर 19 ते 23 जुलैला सकाळी 8 ते दुपारी 12 सुरू राहतील.
- लग्न समारंभ करण्यास अगोदरच परवानगी घेतली असेल तर 20 जणांच्या उपस्थितीमध्ये विवाह सोहळा करता येईल.
- पेट्रोल पंप हे केवळ शासकीय वाहने आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहतील.
- पिंपरी-चिंचवड शहरातील एमआयडीसी किंवा खासगी जागेतील उद्योग सुरू राहणार आहेत.
- शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, सर्व प्रकारच्या शिकवणीचे वर्ग बंद राहणार आहेत.
- तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सार्वजनिक आणि खासगी वाहने बंद राहतील.
- बांधकाम साईट्स बंद राहणार आहेत. मात्र, कामगारांची राहण्याची सोय केल्यास काम सुरू ठेवता येणार आहे.