महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मध्यप्रदेशासह आंतरराज्यातील पिस्तुल विकणाऱ्या टोळीच्या प्रमुखांना अटक; 42 पिस्तुल 66 जिवंत काडतुसे जप्त - पिंपरी चिंचवड क्राईम न्यूज

मध्यप्रदेश येथे दोन दिवस वेशांतर करून तळ ठोकून मुख्य आरोपी मनिसिंग गुरमुख सिंग भाटिया ताब्यात घेऊन त्याच्याकडून 11 गावठी पिस्तुल 22 जिवंत काडतुसे हस्तगत केली. संबंधित आरोपी चा साथीदार कालूसिंग जसवंत सिंग याने महाराष्ट्रातील अनेक गुन्हेगारांना 75 पिस्तुल विक्री केल्याचे निष्पन्न झाले.

pimpari chinchwad police news  pimpari chinchwad crime news  pimpari chinchwad latest news  pistol bullets seized news pune  पिंपरी चिंचवड पोलीस न्यूज  पिंपरी चिंचवड क्राईम न्यूज  पिस्तुल, काडतुसे जप्त पिंपरी चिंचवड
मध्यप्रदेशासह आंतरराज्यातील पिस्तुल विकणाऱ्या टोळीच्या प्रमुखांना अटक; 42 पिस्तुल 66 जिवंत काडतुसे जप्त

By

Published : Jul 16, 2020, 3:38 PM IST

पुणे -पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मध्यप्रदेश आणि आंतरराज्यात पिस्तुल विक्री करणाऱ्या 15 टोळीच्या प्रमुखांना अटक केली. त्यांच्याकडून 19 लाख 89 हजार रुपये किमतीचे 42 पिस्तुल आणि 66 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या युनिट चारने ही कारवाई केली आहे.

मध्यप्रदेशासह आंतरराज्यातील पिस्तुल विकणाऱ्या टोळीच्या प्रमुखांना अटक; 42 पिस्तुल 66 जिवंत काडतुसे जप्त

गणेश मारुती माळी, गोटू उर्फ ज्ञानोबा गीते, भाटिया, आकाश वाघमोडे, योगेश विठ्ठल कांबळे, तुषार, योगेश जगदीश, योगेश उर्फ आबा तावरे, कुश नंदकुमार पवार, चेतन उर्फ मामा लिमन, अक्षय दिलीप केमकर, प्रसन्न पवार, प्रकाश उर्फ पप्पू किसन मांडेकर, सिराज सलीम शेख, प्रगेश नेटके असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मार्च महिन्यात पोलीस नाईक लक्ष्मण आढारी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी आरोपी गणेश माळी याच्याकडून एक पिस्तुल हस्तगत केले होते. त्याला अटक करून चौकशी केली असता हस्तगत केलेले पिस्तुल हे बीड जिल्ह्यातील परळी येथे राहणाऱ्या ज्ञानबा उर्फ गोटू मारुती गीते याच्याकडून घेतल्याचे सांगितले. या गुन्ह्यात संबंधित गीतेला पोलिसांनी अटक केली. दोघांकडून एकूण सहा पिस्तुल आणि 15 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. अधिक तपास केला असता गोटू गीते याने मध्यप्रदेश येथील धार जिल्ह्यातून पिस्तुल आणली होती, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले. त्यांना मध्यप्रदेश येथे पाठविण्यात आले. पोलीस कर्मचारी यांनी वेशांतर करून पिस्तुल खरेदी विक्रीची सविस्तर माहिती काढली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अ‌ॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला.

मध्यप्रदेश येथे दोन दिवस वेशांतर करून तळ ठोकून मुख्य आरोपी मनिसिंग गुरमुख सिंग भाटिया ताब्यात घेऊन त्याच्याकडून 11 गावठी पिस्तुल 22 जिवंत काडतुसे हस्तगत केली. संबंधित आरोपी चा साथीदार कालूसिंग जसवंत सिंग याने महाराष्ट्रातील अनेक गुन्हेगारांना 75 पिस्तुल विक्री केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली. महराष्ट्रात 26 आरोपी असल्याचे समोर आले असून 15 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 42 पिस्तुल आणि 66 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details