पुणे - अंध व्यक्तींना अनुभवता येणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन शहरात भरवण्यात आले आहे. यावेळी डोळस व्यक्तींसोबतच त्यांनीही या चित्रांचा आनंद घेतला. एवढेच नाही तर त्यांनी चित्रांचे मर्मदेखील समजावून सांगितले.
पुण्यात अंधांना अनुभवता येणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन - चिंतामणी हसबनीस
गेल्या ५ वर्षांपासून चिंतामणी हसबनीस अंध व्यक्तींना अनुभवता येतील, असे चित्र काढतात. त्यांच्या अशाच चित्रप्रदर्शनाची अनुभूती नुकतीच पुणेकरांना अनुभवायला मिळाली.
चित्रकार चिंतामणी हसबनीस यांचे चित्र बघून गाणकोकीळा लतादिदींनी त्यांची पाठ थोपटली होती. सचिन तेंडुलकरनेही स्वचःचे पोर्ट्रेट पाहून चिंतामणींच्या कलेला सलाम ठोकला होता. एवढेच नाही, तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी जन्मांध धृतराष्ट्र आणि डोळ्याला पट्टी बांधलेली गांधारी या दोन्ही अंधासमोर महाभारताचे युद्ध साक्षात उभे करणाऱ्या 'संजया'ची उपमा चित्रकार चिंतामणी यांना दिली आहे. गेल्या ५ वर्षांपासून ते अंध व्यक्तींना अनुभवता येतील, असे चित्र काढतात. त्यांच्या अशाच चित्रप्रदर्शनाची अनुभूती नुकतीच पुणेकरांना अनुभवायला मिळाली.