महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अजित पवारांचे भर सभेतील फोनवरील संभाषण चर्चेत

भर सभेत अजित पवारांचे फोनवरील संभाषण सध्या चर्चेचा विषय आहे. अजित पवार हे दत्तात्रय भरणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इंदापूरला आले होते.

सभेत फोनवर बोलताना अजित पवार

By

Published : Oct 5, 2019, 7:44 PM IST

पुणे - 'भर म्हणावं फॉर्म, इतके दिवस कोणी अडवलं होतं? तुला पाहिजे तो निर्णय घे...सारखे-सारखे फोन करु नकोस' भर सभेत अजित पवारांचे फोनवरील हे संभाषण सध्या चर्चेचा विषय आहे. अजित पवार हे दत्तात्रय भरणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इंदापूरला आले होते.

अजित पवारांचे भर सभेतील फोनवरील संभाषण चर्चेत


भरणे यांच्या जाहीर सभेत पवार भाषण करत होते. त्याचवेळी भोसरी राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास लांडे हे फोन करत असल्याची चिठ्ठी अजित पवारांना देण्यात आली. पवार भर भाषाणातच संतापले.

हेही वाचा - राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांचा अर्ज बाद

अजित पवारांच्या या कृतीतून तडकाफडकी स्वभाव दिसून आला. या भाषणा दरम्यानच विलास लांडे यांची उमेदवारी घोषित झाल्याचे इंदापूरकरांना पाहायला मिळाले. शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटी तारीख असल्याने उमेदवारी संदर्भात आलेला फोन त्यांनी घेतला. पवारांनी फोन घेताच तेथे उपस्थित असलेल्या काही नेते मंडळींनी माईकचे बटन बंद करण्याच्या सुचना केल्या. त्यावर अजित पवारांनी त्यांना असे करण्यापासून थांबवले.

ABOUT THE AUTHOR

...view details