पुणे - यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजरात आज सोमवती अमावस्येला कुलदैवत असलेल्या खंडोबाला भंडाराची उधळण करत, राज्यभरातुन भाविक निमगाव खंडोबा मंदिरात सकाळी पहाटेपासून दाखल झाले. आज दिवसभर सर्वत्र यळकोट यळकोट जय मल्हार, असा जल्लोष चिमुकल्यांसह नागरिकांमध्ये पहायला मिळला.
यळकोट यळकोट जय मल्हार...सोमवतीला निमगाव खंडोबा मंदिरात भंडाराची उधळण
निमगाव येथे प्राचीन काळीन कुलदैवत खंडोबाचे मंदिर आहे. या मंदिरात सोमवती अमावस्येला मोठा उत्सव साजरा केला जातो. राज्यभरातुन जयमल्हाराचे दर्शन घेण्यासाठी लोक सहकुटुंब परिवार येत असतात.
निमगाव येथे प्राचीन काळीन कुलदैवत खंडोबाचे मंदिर आहे. या मंदिरात सोमवती अमावस्येला मोठा उत्सव साजरा केला जातो. राज्यभरातुन जयमल्हाराचे दर्शन घेण्यासाठी लोक सहकुटुंब परिवार येत असतात. घरातील देव या ठिकाणी आणुन त्यांची याठिकाणी पुजा केली जाते. तळी भंढाराची उधळण करत तळी भरली जाते व मोठ्या भक्तीभावाने प्रत्येक भाविक भंडारामध्ये पिवळा होऊन जातो.
या निमित्ताने मंदिर आवारात जागरण गोंधळाचा कार्यक्रम मोठ्या थाटात मांढला जातो. नवीन लग्न झालेली जोडी या जागरणामध्ये सहभागी होतात. शेवटी देवाला नैवद्य देऊन प्रत्येक जण परतीचा प्रवास करतात. मात्र, आज सर्व वाहतुक कोंडीच्या समस्येचा नागरिकांना सामना करावा लागला होता.