महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरेगाव भीमा : कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी शौर्य दिनाची मानवंदना घरातूनच द्या; प्रशासनाचे आवाहन - Battle of Koregaon Bhima

१ जानेवारीच्या शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाजवळ नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र, कोरोनाचा काळात समूह संसर्गाचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच नागरिकांना या दिवशी विजयस्तंभाजवळ गर्दी न करता घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

pune news
शौर्य दिनाची मानवंदना घरातूनच द्या

By

Published : Dec 30, 2020, 7:30 AM IST

पुणे - कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला १ जानेवारी या शौर्यदिनी मानवंदना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी घेत योग्य पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. १ जानेवारी हा शौर्य दिन गणेशोत्सव, नवरात्र, आषाढीवारी, कार्तिकीवारी, संजीवन समाधी सोहळा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती,या कार्यक्रमांच्या धर्तीवर मर्यादित लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाचा समूह संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घरातूनच शौर्यस्तभांला मानवंदना द्यावी, असे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे.

प्रशासनाकडून विजयस्तंभ परिसरात पहाणी-
प्रशासनाकडून विजयस्तंभ परिसरात पहाणी-कोरेगाव भीमा विजयस्तंभ या ठिकाणी शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमस्थळाची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मंगळवारी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी नियमांचे पालन करत शौर्य दिन साजरा करण्याबाबत नागरिकांना आवाहन केले. या पाहणी दौऱ्यानंतरच्या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख व सचिन बारावकर, पेरणे चे सरपंच रुपेश ठोंबरे, कोरेगाव भीमा विजयस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, विविध विभागांचे अधिकारी, विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
शौर्य दिनाची मानवंदना घरातूनच द्या; प्रशासनाचे आवाहन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसुविधांसह प्रशासन सज्ज....

विजयस्तंभावर १ जानेवारी रोजी शौर्यदिनाला मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पल्स ऑक्सीमीटर व थर्मामीटर तपासणी करावी, सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे, सोशल डिस्टन्सिंगच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, पिण्याच्या पाण्याची सोय करावी आदी सूचना आरोग्य विभागास देण्यात आल्या आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त, अग्निशमन दल, पार्कींग सुविधा, वाहतूक व्यवस्था, विद्युत व्यवस्था, फिरत्या स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे, याची देखील पाहणी प्रशासनाकडून मंगळवारी करण्यात आली आहे.

प्रशासनाकडून विजयस्तंभ परिसरात पहाणी-
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवाहन-

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमादरम्यान कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. त्या दृष्टीने कोरेगाव भीमा, व परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे व शौर्यदिनाचा कार्यक्रम सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details