पुणे- देशभरात आज विविध रंगांची उधळण होत असून लहान-मोठ्यांसह सगळेच रंगोत्सवात दंग झाले आहेत. पुण्यातही धूळवडीचा उत्साह आहे. रस्त्यावर उतरून तरुणाई एकमेकांवर रंग उधळताना दिसत आहेत. परंतु, या उत्सवावर कोरोना विषाणूच्या भीतीचा परिणाम जाणवत आहे. एरव्ही शहरात ठिकठिकाणी तरुण, तरुणी एकमेकांना रंग लावण्यासाठी मोठया प्रमाणावर एकत्र येत होते. पण, यंदा तुरळक गर्दी दिसून येत आहे. होळी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरी केल्या जात असल्याचे चित्र आहे.
कोरोना विषाणूच्या सावटाखाली पुण्यात धुळवड साजरी
एरव्ही शहरात ठिकठिकाणी तरुण, तरुणी एकमेकांना रंग लावण्यासाठी मोठया प्रमाणावर एकत्र येत होते. पण, यंदा तुरळक गर्दी दिसून येत आहे. होळी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला जात असल्याचे चित्र आहे.
धूळवड साजरी करताना नागरिक