महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार द्या; पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा ठराव - पिंपरी चिंचवड महापालिकेचा ठराव

रतन टाटा यांनी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी १५०० कोटी रुपये पीएम केअर फंडात देणगी म्हणून दिलेले आहेत. त्यांचे देशासाठीचे मोठे योगदान लक्षात घेत त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, असा ठराव पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.

pcmc general meeting
रतन टाटा - संग्रहित छायाचित्र

By

Published : Jun 5, 2020, 11:56 AM IST

पुणे-प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे, असा ठराव पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधरण सभेत मंजूर करण्यात आला आहे. एका उपसुचनेद्वारे प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्याला मंजुरी देत याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. शहरात टाटा मोटर्स समुहाचा मोठा उद्योग असून यामुळे शहरातील अनेकांना नोकरी मिळाली आहे. तर अनेक बेरोजगारांना हाताला काम मिळाले आहे. रतन टाटा यांनी नुकतेच मुंबईतील कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रुम्स उपलब्ध करून दिल्या होत्या.

पिंपरी चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभा

रतन टाटा यांनी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी १५०० कोटी रुपये पीएम केअर फंडात देणगी म्हणून दिलेले आहेत. त्यांचे देशासाठी मोठे योगदान आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत रतन टाटा यांना भारतरत्न देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. उपमहापौर तुषार हिंगे यांनी प्रस्ताव मांडला याला केशव घोळवे यांनी अनुमोदन दिले. एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वच नगरसेवकांनी तोंडाला मास्क बांधलेला पाहायला मिळाला.सभेत फिझिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details