पुणे-नाशिक महामार्गावर, दरीत पडलेल्या तरुणाला वाचविण्यात प्रवाशांना यश... - पुणे-
पुणे-नाशिक महामार्गावर खेड घाटात एका चारचाकीने दुचाकीला धडक दिली. या धडकेमुळे एक दुचाकीस्वार युवक दुचाकीसह खोल दरीत पडला. या युवकाच्या मदतीला रस्त्याने प्रवास करणारे प्रवासी एकत्र आले आणि दोराच्या साहाय्याने या युवक आणि दुचाकीला दरीतुन बाहेर काढण्यात आले.
पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असते, यापैकी अनेक अपघाताग्रस्तांना मदत न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागतो. शुक्रवारी सायंकाळी मात्र या महामार्गावर याला अपवाद ठरेल, असे दृष्य पाहायला मिळाले. पुणे-नाशिक महामार्गावर खेड घाटात एका चारचाकीने दुचाकीला धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीस्वार तरुण दुचाकीसह खोल दरीत पडला. या तरुणाच्या मदतीला रस्त्याने प्रवास करणारे प्रवासी एकत्र आले आणि दोराच्या साहाय्याने त्याला आणि दुचाकीला दरीतून बाहेर काढले. योगेश किसन घोमाल (रा.अकोले, जिल्हा अहमदनगर )असे या तरुणाचे नाव आहे.