पुणे -खेड तालुक्यातील अनेक गटांत आणि गणांमध्ये कोट्यवधी रुपयांची कामे झाली. मात्र, आम्ही आजपर्यंत तुमच्या मागे फिरूनही आमच्या वाट्याला विकास कामेच येत नाहीत. तुम्ही दिलेल्या शिफारस पत्रांतही पैसे नसतात, मग तुमच्या मागे फिरून उपयोग काय? आमचीच कामे होत नाहीत, तर बाकीच्यांचं काय? असा सवाल आमदार गोरेंचे खंद्दे समर्थक मारुती सातकर यांनीच गोरेंना केला आहे. विशेष म्हणजे सातकर यांनी भर बैठकीत हा सवाल केला आहे.
आमदारसाहेब तुमच्यामागे फिरूनही विकासकामे होत नाहीत, खंद्द्या समर्थकाचा आमदार गोरेंना सवाल - MLA Gore
आज आम्हाला उत्तर द्या, विकासकामे आता तरी करणार का, असा सवालही सातकर यांनी आमदार गोरेंना केला. यामुळे खेड तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.
यावेळी, आज आम्हाला उत्तर द्या, विकासकामे आता तरी करणार का, असा सवालही सातकर यांनी आमदार गोरेंना केला. यामुळे खेड तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. सात जिल्हा परिषद, तीन नगरपरिषद, वारकऱयांचे श्रद्धास्थान आळंदी, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भिमाशंकर असणारा हा विधानसभा मतदार संघ आहे. या मतदार संघात आजपर्यत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. त्यामुळे हुकमी राजकारणाला येथील मतदारांनी रामराम करत नव्याने शिवसेनेचे सुरेश गोरे यांना विधानसभेला संधी दिली. एका तालुक्यात विकासाचे स्वप्न पाहिले. मात्र, आता विरोधाकांऐवजीच खंद्दे समर्थक असणारे कार्यकर्तेच आमदारांवर भर बैठकतच आरोप करू लागले आहेत.
खेड तालुक्यातील गावागावांत झालेली विकास कामे, प्रलंबित कामे, नव्याने करावयाची कामे यासाठी सरपंच ग्रामसेवक व शासकिय आधिकाऱयाची पंचायत समिती सभागृहात दोन दिवसांपासून बैठक सुरू होती. त्यावेळी अनेक गावकारभारी असणाऱया सरपंचांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे चित्र पहायला मिळाले. दुसरीकडे खंद्दे समर्थक असणाऱया कार्यकर्त्यांनेच आमदारसाहेब तुमच्या माध्यमातून माझ्या गावात विकासकामे होत नाहीत, असा थेट आरोप करत आमदार सुरेश गोरेंना घरचा आहेर दिला.