महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...अन पार्थ पवार भजन करण्यात रमले - bhajan

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पार्थ पवार हे त्यांच्या पहिल्या भाषणामुळे सोशल मीडियावर ट्रोल झाले होते.त्यानंतर शनिवारी मावळ मतदारसंघातील खालापूर तालुक्यात प्रचार दौऱ्यात असताना पार्थ पवार हे भजन करण्यात मग्न झाले.

पार्थ पवार भजन करताना

By

Published : Apr 7, 2019, 12:40 AM IST

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार हे उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीपासूनच चर्चेत आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील पार्थ पवार हे त्यांच्या पहिल्या भाषणामुळे सोशल मीडियावर ट्रोल झाले होते.त्यानंतर शनिवारी मावळ मतदारसंघातील खालापूर तालुक्यात प्रचार दौऱ्यात असताना पार्थ पवार हे भजन करण्यात मग्न झाले.

मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार भजन करताना

खालापूर तालुक्यात प्रचार दौरा सुरू असताना नावंडे गावात गणपती मंदिरात भजन सुरू होते. त्यावेळी पार्थ पवार हे त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांशी संवाद साधण्यासाठी गेले. परंतू, मंदिरात भजन सुरू असल्याचे पाहताच पार्थ पवार हे त्या मंदिरात गेले. त्यानंतर त्यांनी हातात टाळ घेत भजनाचा आनंद घेतला. पार्थ पवार हे भजनात रमल्याचे पाहताच उपस्थित असनारे सर्वच लोक आश्चर्यचकित झाले. पार्थ पवार हे भजन करण्यात रमले असल्याचे पाहताच उपस्थित भजनी मंडळात आणखी उत्साह वाढला.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details