पिंपरी-चिंचवड(पुणे) - पिंपरी-चिंचवडमध्ये खासगी शाळेने तिप्पट फी वाढ केल्याने पालकांनी संताप व्यक्त केला ( Pimpri Chinchwad Parents agitation ) आहे. पिंपळे गुरवमधील द मिलेनीअम शाळेने 15 हजारावरून थेट 45 हजार रुपये फी वाढ केली. फी वाढ करताना पालकांना शाळा प्रशासनाने विश्वासात घेतले नाही असा आरोप पालकांनी ( School 200 Percent Fees Increased ) केलाय. फी वाढीचा पालकांनी निषेध केला. सर्वसामान्य व्यक्तींना फी वाढ परवडत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. मिलेनीअम शाळेच्या मुख्यद्यापीकेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
इमारत बांधली आणि फी वाढवली -पालकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पहिली शाळा वेगवेगळ्या जागेवर भरत होती. त्यानंतर शाळेने आता नवी इमारत बांधली आणि चक्क 200 टक्कांनी फीस वाढवली आहे. ही फीस सामान्य घरातील नागरिकांच्या आवाक्या बाहेरील आहे. त्यामुळे शासकिय नियमाप्रमाणे फक्त प्रशासनाने 15 टक्के फीस वाढ करावी. अशी मागणी आमची आहे.