आळंदी / पुणे -संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ज्या शिवशाही बसने पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. त्या बस आळंदी नगरीमध्ये दाखल झाल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या शिवाजीनगर आगारच्या दोन शिवशाही बसेस, सर्व्हिस व्हॅनसह ८ ते १० कर्मचारी अलंकापुरीमध्ये दाखल झाले आहेत.
माऊलींची पालखी उद्या पंढरपूरकडे होणार मार्गस्थ
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका श्री क्षेत्र अलंकापुरीवरून पंढरपूरकडे सोमवारी (19 जुलै) मार्गस्थ होणार आहेत. यासाठी देवस्थान समिती आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. हा सोहळा 40 वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. उद्या सकाळी 4 वाजता माऊलींच्या पादुकांना रुद्राअभिषेक करून या सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर सकाळी सात वाजता कीर्तन होणार आहे. साडेआठला माऊली पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत.