दौंड (पुणे) -जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीने आज दुपारच्या सुमारास दौंड तालुक्यातील रोटी घाटाचा टप्पा पार केला. कोरोनाचे सावट असल्याने यंदा संत तुकाराम महाराजांची पालखी शिवशाही बसने नेण्यात येत आहे. पालखीसोबत मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. रोटी घाटमाथ्यावर परंपरेप्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची अभंग आरती घेण्यात आली.
ASHADHI WARI 2021 : संत तुकाराम महाराजांच्या पालखीने पार केले रोटी घाट
रोटी घाटातुन हा पालखी सोहळा मार्गस्थ झाला. रोटी घाट पार केल्यानंतर घाट माथ्यावर विसावा घेतला जातो. ही परंपरा कायम ठेवत आज पालखी सोहळ्याने काही क्षण रोटी घाटाच्या माथ्यावर विसावा घेतला. घाट माथ्यावर अभंग आरती घेण्यात आली.
पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी देहू ते पंढरपूर या मार्गावरून जात असताना रोटी घाट हा अवघड टप्पा समजला जातो. या टप्प्यावर अनेक बैलजोड्या पालखी घाटातून वर नेण्यासाठी जोडल्या जात असतात. मात्र यंदा कोरोनामुळे पायी वारी रद्द करण्यात आल्याने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी फुलांनी सजवलेल्या बसमधून नेण्यात आली. काही मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. रोटी घाटातुन हा पालखी सोहळा मार्गस्थ झाला. रोटी घाट पार केल्यानंतर घाट माथ्यावर विसावा घेतला जातो. ही परंपरा कायम ठेवत आज पालखी सोहळ्याने काही क्षण रोटी घाटाच्या माथ्यावर विसावा घेतला. घाट माथ्यावर अभंग आरती घेण्यात आली. यानंतर पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला.