जुन्नर (पुणे) - शेतकऱ्याचा खरा सोबती म्हणजे बैल. शेतकऱ्याबरोबर दिवसभर हाच बैल शेतात काबाड कष्ट करतो. सध्या खरिपाचा हंगाम सुरू झाला असून काही ठिकाणी पाऊसाच्या सरी बरसल्या तर काही ठिकाणी पावसाची प्रतिक्षा आहे. त्यामुळे, शेतकरी शेतीच्या मशागतीच्या व पेरणीसाठी बैल खरेदीला बैलबाजारात जात आहे.
कोरोनाच्या संकटात बेल्हे बैलबाजारात बैलांची आवक वाढली, बाजारभाव स्थिर - बेल्हे बैलबाजार
पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर जुन्नर तालुक्यातील बेल्हे या गावी बैल बाजार भरतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे हा बाजार मागील तीन महिन्यांपासून बंद असलेला बैल बाजार पुन्हा सुरू झाला असून बैल खरेदी व विक्रीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे.
बैल बाजारातील गर्दी