महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यात नागरिकांकडून लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन, 20 लाखांचा दंड वसूल - पुणे लॉकडाऊन अपडेट्स

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना करुन कंटेन्मेंट झोन करुन नागरिकांना बाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, नियमांची पायमल्ली करत अनेकजण बाहेर पडत होते. त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत, नगरपरिषद, यांनी पोलीसांच्या मदतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. यामध्ये तब्बल 20 लाख 47 हजारांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे.

20 लाखांचा दंड वसूल
20 लाखांचा दंड वसूल

By

Published : Jul 22, 2020, 10:52 PM IST

पुणे :जिल्हातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यानी पुन्हा लॉकडाऊन करण्याचे आदेश काढत बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाईची तरतुद केली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये मास्क न वापरणाऱ्या 6799 लोकांकडून 20 लाख 47 हजार 150 रुपयांचा दंडाची वसुली केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

पुणे जिल्हात गेल्या महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना करुन कंटेन्मेंट झोन करुन नागरिकांना बाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, नियमांची पायमल्ली करत अनेकजण बाहेर पडत होते. त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत, नगरपरिषद, यांनी पोलीसांच्या मदतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. यामध्ये तब्बल 20 लाख 47 हजारांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोनाचे 56621 रुग्ण झाले असुन 1442 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा वाढता आकडा लक्षात घेऊन प्रशासनाकडुन कडक धोरणांची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र अनेकजण प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याने कोरोनाचा समूह संसर्ग वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details