पुणे - धनगर समाजासाठी राज्य शासनाने एक हजार कोटींची तरतूद केली आहे. मात्र शासनाने धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत तातडीने लक्ष घालावे आणि या समाजातील विद्यार्थ्यांची होणारी ससेहोलपट थांबवावी, अशी मागणी करत धनगर समाजातील नेते गोपीचंद पडळकर यांनी आज पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे.
अन्यथा धनगर समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल - गोपीचंद पडळकर - जहला
शासनाने धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत तातडीने लक्ष घालावे आणि या समाजातील विद्यार्थ्यांची होणारी ससेहोलपट थांबवावी, अशी मागणी करत धनगर समाजातील नेते गोपीचंद पडळकर यांनी आज पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे.
मंगळवारी 18 जूनला राज्य सरकारने धनगर समाजाकरता एक हजार कोटींची तरतूद केली आहे. धनगर समाजातील विदयार्थ्यांना अनुसूचित जमातीमधील दाखले मिळत नसून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने यात लक्ष घालून न्याय दयावा, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी धनगर समाजाकडून महाड ते मुंबई असा मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी सरकारने याबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. जर याबाबत राज्य शासनाने लक्ष घातले नाही. तर धनगर समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल, असा इशार पडळकर यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.