पुणे:ऑनलाईन सोडतीसाठी ३१२० सदनिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य २९३८ सदनिका एकूण ६०५८ सदनिकासाठी पुणे मंडळातर्फे वीस टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यांतर्गत २९३८ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २४८३ सदनिका आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ६३७ सदनिका अशा एकूण ६०५८ सदनिकांची ऑनलाइन सोडत आज पुणे मंडळात काढण्यात आली. सदनिकांची ऑनलाइन सोडत उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माणमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे काढण्यात आली. यासाठी एकूण 58 हजार 307 जणांनी अर्ज केला होता.
पुणे मंडळात ही 11वी सोडत: याबाबत म्हाडाचे मिळकत व्यवस्थापक विजय ठाकूर म्हणाले की, 6 हजार 58 घरांसाठी ही सोडत देण्यात आली होती. यातील 3 हजार 120 घरांची सोडत आज काढण्यात आली आहे. बाकीचे जे 2900 सोडत होती त्यातील 'फस्ट कम फस्ट' या तत्त्वावर ते देण्यात आले आहेत. पुणे मंडळात ही 11वी सोडत होती. आज ज्यांना घरे लागली आहेत त्यांना सायंकाळी सहा वाजता मेलद्वारे माहिती देण्यात येणार आहे. ज्यांना घर मिळाली आहेत त्यांनी आठ दिवसात प्रक्रिया करून द्यावी. नवव्या दिवशी त्या पूर्ण न झाल्यास त्या रद्द करण्यात येतील, असे देखील यावेळी ठाकूर म्हणाले. मी पहिल्यांदाच म्हाडाचा अर्ज भरला होता आणि मला पहिल्याच प्रयत्नातच घर लागल्याने खूप आनंद होत आहे. ते ही मला नांदेड सिटी येथे घर लागले असल्याचे यावेळी एका लॉटरीत घर लागलेल्या व्यक्तीने सांगितले आहे.