महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 29, 2022, 11:59 AM IST

Updated : Apr 29, 2022, 12:14 PM IST

ETV Bharat / state

Pune Crime News : इंस्टाग्रामवर स्टेट्स ठेवून छातीत कोयता मारण्याची धमकी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पिंपरी चिंचवडमध्ये इंस्टाग्रामवर स्टेट्स ठेवून छातीत कोयता मारण्याची धमकी देणाऱ्या भाईला शस्त्र विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या ( Threatening to stab in chest by posting statuses on Instagram ) आहेत. तेजस नितीन वायदंडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चार कोयते देखील जप्त केले आहेत. अजय आणि रणजित चव्हाण नावाच्या गुन्हेगाराला मारण्याची धमकी स्टेट्समधून देण्यात आली आहे.

Pune Crime News
इंस्टाग्रामवर स्टेट्स ठेवून छातीत कोयता मारण्याची धमकी

पिंपरी-चिंचवड (पुणे) -इंस्टाग्रामवर स्टेट्स ठेवून छातीत कोयता मारण्याची धमकी देणाऱ्या भाईला शस्त्र विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या ( Threatening to stab in chest by posting statuses on Instagram ) आहेत. तेजस नितीन वायदंडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चार कोयते देखील जप्त केले आहेत. अजय आणि रणजित चव्हाण नावाच्या गुन्हेगाराला मारण्याची धमकी स्टेट्समधून देण्यात आली आहे.

इंस्टाग्राम स्टोरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगारांनी विरोधी गटातील गुन्हेगाराला धमकवण्यासाठी इंस्टाचा वापर करण्यात असल्याचे वारंवार समोर आले आहे. असाच प्रकार पिंपरी-चिंचवडच्या शस्त्र विरोधी पथकाने पुढे आणलाय, या प्रकरणी तेजस नितीन वायदंडे याला शस्त्र विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी बेड्या ठोकल्यात. गुन्हेगार पार्श्वभूमीचा असलेला तेजसने इंस्टावर छातीत कोयते मारण्याची धमकी रणजित चव्हाण आणि अजय नावाच्या गुन्हेगाराला दिली आहे, पैकी चव्हाण हा तडीपार. या दोन्ही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तरुणांना खुले आवाहन स्टेट्सच माध्यमातून आरोपी तेजसने दिले. हा व्हिडीओ व्हायरल होत असताना तो शस्त्र विरोधी पथकाची हाती लागला. तेजसला शस्त्र विरोधी पथकाने बेड्या ठोकत त्याच्याकडून चार कोयते देखील जप्त केले आहेत.

हेही वाचा -Share Market Today : सकारात्मक जागतिक संकेतांमुळे निफ्टी 17300 वर, तर सेन्सेक्सची 200 अंकांची उसळी

Last Updated : Apr 29, 2022, 12:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details