महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सावकारी जाचाला कंटाळून वायरमनची आत्महत्या, चिठ्ठीत होता दोन राजकारण्यांचा उल्लेख

शवंत पवार यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळली. या चिठ्ठीत पवार यांनी दोन व्यक्तींची नावे लिहिली असून यांना कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, चिठ्ठीतील ही दोन नावे कोणाची हे आताच सांगता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

सावकारी जाचाला कंटाळून वायरमनची आत्महत्या

By

Published : Apr 26, 2019, 2:05 PM IST

पुणे - सावकारी जाचाला कंटाळून पुण्यातील धायरी येथे एकाने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या खिशात चिठ्ठी मिळाली असून त्यात राजकीय क्षेत्रातील दोघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यात नमूद आहे. यशवंत हरिभाऊ पवार (वय ५४) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. विषारी औषध पिऊन त्यांनी आत्महत्या केली.

यशवंत पवार हे वायरमन होते. त्यांनी गुरुवारी दुपारी पत्नीला आत्महत्या करणार असल्याचा मेसेज व्हाट्अॅपवर पाठवला होता. त्यानंतर त्यांनी धायरी परिसरातील एका पाण्याच्या टाकीवर जाऊन किटकनाशक पिऊन आत्महत्या केली. दरम्यान, त्यांच्या पत्नीने सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा मेसेज पाहिला. त्यानंतर त्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोन तरुणांना यशवंत पवार एका पाण्याच्या टाकीवर बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

थोड्याच वेळात सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. त्यांनी तपासणी केली असता, त्यांना यशवंत पवार यांच्या खिशात एक चिट्ठी आढळली. या चिट्ठीत पवार यांनी दोन व्यक्तींची नावे लिहिली असून यांना कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, चिठ्ठीतील ही दोन नावे कोणाची हे आताच सांगता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा योग्य तो तपास करून गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details