महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

पीडित महिला रांजणगाव एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत गेल्या अनेक दिवसांपासून काम करत असताना तिची ओळख योगेश गणपत शिंगोटे(वय २७,सध्या रा. रांजणगाव गणपती, ता.शिरुर,जि. पुणे) याच्यासोबत झाली. या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झाले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर बलात्कार करत होता.

रांजणगाव पोलीस
रांजणगाव पोलीस

By

Published : May 22, 2021, 1:08 AM IST

पुणे -जिल्ह्याच्या रांजणगाव औद्योगिक पोलीस स्टेशनच्या हद्दीत लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी एका वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती रांजणगाव पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ही यश इंन चौक कारेगाव येथे गेल्या तीन वर्षांपासून एकटीच राहत आहे. पीडित महिलेचे सन 2007 मध्ये श्रीकांत सखाराम केदारी (वय 35, रा. वलगुड कामठी ता. श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर) यांच्याशी लग्न झाले होते. पीडित महिलेचे तिच्या नवऱ्यासोबत पटत नसल्याने तिने घटस्फोट घेऊन कारेगाव येथे राहत होती. तिला एक बारा वर्षांचा मुलगा असून तो आईवडिलांकडे सांभाळण्यासाठी असतो. पीडित महिला रांजणगाव एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत गेल्या अनेक दिवसांपासून काम करत असताना तिची ओळख योगेश गणपत शिंगोटे(वय २७,सध्या रा. रांजणगाव गणपती, ता.शिरुर,जि. पुणे) याच्यासोबत झाली. या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झाले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर बलात्कार करत होता. गेल्या दोन महिन्यांपासून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी योगेशवर रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details